Benefits of extending PC/Laptop RAM | रॅम वाढवण्याचे फायदे - 'रॅम'नामाचा महिमा

0
तुमचा जुना कॉम्पुटर किंवा मोबाइलचा वेग मंदावला आहे का? किंवा तुम्ही नुकतेच एक नवीन कॉम्पुटर विकत घेतला असेल आणि आता आपले आयुष्य खुप चांगले व्यतीत होईल असा विचार करत असाल तर थांबा… कारण, तुम्ही चुकताय.

जेव्हा तुम्ही नवीन लॅपटॉप /कॉम्पुटर किंवा मोबाइलवर गेम खेळायला सुरुवात कराल किंवा एकावेळेस ३ ते ४ अँप्लिकेशन्स उघडाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि तुमचा कॉम्पुटर/मोबाइल ग्राफिक्स किंवा ऍनिमेशन पाहिजे तेवढे स्पष्ट दिसत नाहीत किंवा ३ ते ४ अँप्स हॅन्डल करताना लॅपटॉप किंवा मोबाइलचा जीव जातोय. तुम्ही म्हणाल माझा मोबाइल, लॅपटॉप तर नवीन आहे. मग हे असे का घडते आहे? कारण, तुमच्याकडे अगदी लेटेस्ट, ब्रँड न्यू लॅपटॉप/मोबाइल आहे म्हणजे तो फास्ट किंवा उत्कृष्ट आहेच असं नाही.


चित्र: लॅपटॉप/कॉम्पुटरची रॅम (मेमरी स्टिक)

पण एक गुड न्यूज आहे सोबतच एक बॅड सुद्धा.
गुड न्यूज हि कि- तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्पुटर ला फास्ट करण्यासाठी त्याची रॅम वाढवू शकता, अगदी माफक खर्चात.
तर बॅड न्यूज हि आहे कि- तुम्ही एकदा मोबाइल विकत घेतला तर त्याची रॅम बदलवणे किंवा वाढवणे अजिबात शक्य नाही. म्हणून मोबाईल विकत घेताना आधीच जास्त रॅम असलेला घ्यावा.

लॅपटॉप, कॉम्पुटरला फास्ट बनवण्यासाठी सर्वात कार्यक्षम आणि अत्यंत स्वस्त उपायांपैकी एक म्हणजे रॅम (RAM) अपग्रेड (upgrade) करणे. बर्‍याच नवीन संगणकांमध्ये (computer) खूप कमी रॅम दिलेली असते, २ ते ४ जीबी. एकाचवेळेस २ किंवा त्यापेक्षा जास्त काम करायचे झाल्यास हि मेमरी अपुरी पडते त्यामुळे संगणक स्लो होऊन हँग होणे किंवा "स्क्रीन फ्रीज" (screen freeze) होणे यासारखे प्रकार घडतात. तर, रॅम बदलवणे किंवा वाढवणे हे अगदी सोप्पे आहे, अगदी घरच्या घरी सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. कधी कधी तर रॅम बसवण्यापेक्षा लॅपटॉप किंवा कॉम्पुटर चे स्क्रू उघडायलाच जास्त वेळ लागतो. इतके सोप्पे हे काम आहे.

Extend laptop ram
चित्र: कॉम्पुटर मदरबोर्ड वर रॅम बसवताना.

आजकाल नवीन येणाऱ्या काही लॅपटॉप मध्ये मात्र रॅम वाढवण्याचा (RAM extend) पर्याय मिळत नाही, म्हणजे अतिरिक्त रॅम बसवण्यासाठी त्यामध्ये शिल्लक चा स्लॉटच (slot) नसतो. तर असे लॅपटॉप (Laptop) घेताना आधीच त्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे त्यापेक्षा थोडी जास्तच रॅम असलेलं बघूनच लॅपटॉप खरीदणे सोयीचे होते. मोठा CPU असलेला कॉम्पुटर किंवा काही जुने लॅपटॉप यामध्ये आधीच २ स्लॉट असतात ज्यामध्ये १ रॅम कंपनीकडून आधीच बसवलेली असते तर दुसरा स्लॉट रॅम वाढवण्यासाठी शिल्लक सोडलेला असतो. त्यामध्ये सुद्धा रॅम वाढवण्यास काही बंधने असतात. जसे कि तुमच्या लॅपटॉप ला कंपनीने आधीच जर २ किंवा ३ जीबी रॅम दिलीअसेल तर तुम्ही जास्तीत जास्त ३ ते ४ जीबी रॅम जास्तीची बसवू शकता. जर आधीची रॅम ४ जीबी असेल तर ४ ते ८ जीबी रॅम आणखी जास्तीची लावून तुम्ही लॅपटॉप चा स्पीड वाढवू शकता. आणि असच इतर क्षमतेच्या रॅम साठी हि मर्यादा वाढत जाईल. लॅपटॉप निर्मात्या कंपनी आणि मॉडेल नुसार हि मर्यादा वेगवेगळी असू शकते.

Extend laptop ram
चित्र: लॅपटॉप रॅम स्लॉट्स

रॅम वाढवण्याचे/अपग्रेड करण्याचे फायदे काय?

1. मक्खन मल्टीटास्किंग :

कमी रॅम असल्यास आपण एकाचवेळेस एकापेक्षा जास्त अँप्स किंवा काम करायचं म्हटलं तर आपला लॅपटॉप/कॉम्पुटर लगेच "डोळे पांढरे" करतो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वर तर नेहमीच आपल्याला "Not Responding" आणि एक पांढरी स्क्रीन पाहायला मिळते. रॅम अपग्रेड केल्यास आपल्याला असले प्रॉब्लेम कधीच येणार नाही किंवा अगदी कमी प्रमाणात येईल. म्हणजे तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्पुटर अगदी "मक्खन जैसा स्मूथ" चालेल.

2. फास्टर वेब ब्राउजिंग :

कित्येकदा फास्टर इंटरनेट कनेक्शन असून सुद्धा आपले वेब-ब्राउजर स्लो चालते किंवा इंटरनेटला स्पीड मिळत नाही, किंवा वेब पेजेस खूप संथगतीने उघडतात. वेब वरचे फोटो, विडिओ, आणि,ऍनिमेशन योग्य प्रकारे दिसत नाहीत. तर अशावेळेस रॅम अपग्रेड करून तुम्ही वेगवान नेट सर्फिंग आणि वेब ब्राउजिंग चा आनंद घेऊ शकता.

3. ग्राफिक्स आणि मेकॅनिकल डिझाईनिंग :

जर आपण ग्राफिक किंवा मेकॅनिकल डीझाइनर आहेत आणि आपलयाला वेगवेगळे सॉफ्टवेअर जसे कि फोटोशॉप, कोरल, lightroom, AutoCAD, Tekla, Catia ई. चा वापर करावा लागतो अशावेळेस कमी रॅम असून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला जास्त रॅम लागतो. अशावेळेस रॅम अपग्रेड हा कमी खर्चात प्रभावी उपाय ठरतो.

4. प्रिंटिंग:

तुमचा प्रिंटिंग चा व्यवसाय असेल तर स्लो चालणार कॉम्पुटर तुमची डोकेदुखी ठरू शकते. कारण कॉम्पुटर स्लो म्हणजे वर्ड, pdf फाईल उघडायला जास्त वेळ लागेल, तसेच प्रिंट करायला सुद्धा खूप वेळ लागेल आणि अशावेळेस ग्राहक तुमच्याकडे येऊन समाधानी होणार नाही.म्हणजेच तुम्हाला व्यवसायात तोटा नक्की. इथेही समाधान एकच राहील, ते म्हणजे तुमच्या कॉम्पुटर ची रॅम वाढवणे व एकंदरीत तुमच्या कामाचा आणि कमाईचा स्पीड वाढवणे.

5. विडिओ एडिटिंग:

विडिओ एडिटिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी सॉफ्टवेअर्स जास्त रॅम असेल तर अतिशय उत्कृष्ट आणि वेगवान काम करतात. तुमचा कॉम्पुटर स्लो असेल तर सॉफ्टवेअर पण तसेच मंदगतीने चालेल आणि आपला कामातील पूर्ण इंटरेस्ट जाऊन तुम्ही निराश होऊ शकता. तर, रॅम वाढवा, आशावादी राहा.

6. उच्चतम गेमिंग अनुभव:

लॅपटॉप वर गेम खेळायला कोणाला नाही आवडणार. दिवसेंदिवस प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञानामुळे गेमिंगचा अनुभव सुद्धा अजून "रिच" होत चाललंय. उच्चतम प्रतीचे ग्राफिक्स, रंगसंगती, नवीन ग्राफिक्स कार्ड आणि उच्च स्क्रीन रिजोल्यूशन गेमचा पुरेपूर आनंद घेण्यास सहायक ठरतात. पण हे सर्व एवढं उच्च प्रतीचं असताना रॅम कमी असून कसं चालणार, आजच्या कटिंग एज गेमिंगसाठी ते पुरेसे नाही. अधिक रॅम जोडून आपण हा गेमिंग व 3D गेमिंग चा अनुभव अधिक रंगतदार, आकर्षक व Real Life सारखा बनवू शकता.

7. कार्यक्षम नेटवर्किंग:

जर आपले कंम्पूटर एकाच नेटवर्क वर सर्व्हरशी जोडलेले असेल, तर अधिक रॅम आपले नेटवर्क आणि कॉम्पुटर वेगवान करण्यास सहाय्यक ठरू शकते.

तर, असा हा 'रॅम'नामाचा महिमा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)
To Top