अमेरिका, ब्रिटन मध्ये का वापरल्या जात नाहीत EVM? | Why EVM is not used in US & UK ?

0
आपल्या देशात निवडणूक म्हटलं की प्रामुख्याने उल्लेख येतो तो मतदान यंत्राचा (Electronic Voting Machines). इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) चा भारतीय निवडणूकांमध्ये पहिल्यांदा वापर तसा सन 1982 मध्ये मध्ये केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात परवूर मतदारसंघात 50 बुथवर झाला, आणि EVM च्या वापरामुळे ही लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. नंतर सुप्रीम कोर्टाने ही इलेक्ट्रॉनिक निवडणूक असंवैधानिक ठरवून पुन्हा ballot पेपर वर निवडणूक घेण्यास सांगितले.

EVM ही पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. याची निर्मिती आणि सर्व चाचण्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECI) आणि भारत इलेक्ट्रिकल्स या सरकारी कंपन्यांकडून करण्यात आली आहे.

EVM Machine
EVM ballot Unit

England, Italy, Germany Have Banned EVMs
EVM with Ballot Unit and Control Unit


भारतात EVM चा वापर 1998 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर झाला आणि २०१४ पासून भारतातील सर्व सर्वसाधारण आणि राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली जात आहेत.

इलेक्ट्रॉनिक मतदान सुरू होण्यापूर्वी भारताने पेपर बॅलेट्स आणि मानवीय मतमोजणी पद्धतीचा वापर केला. बनावट मतदान आणि बूथ कॅप्चरिंगमुळे पेपर बॅलेट पद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, जिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ ताब्यात घेतले जायचे आणि मतपेट्या बनावट मतपत्रिकांनी भरले जायचे. छापील पेपर बॅलेट्स अधिक महाग तर होतेच सोबतच मतदाना नंतर लाखो मतपत्रिका मोजण्यासाठी असंख्य मनुष्यबळ आणि वेळ सुद्धा खर्ची पडायचा. शिवाय काही चुकी झाल्यास पूर्ण मतपत्रिका पुन्हा मोजण्यात वेळ आणि पैसा व्यर्थ जायचा.

ब्राझील, भारत आणि फिलीपिन्ससह जगातील काही मोठ्या लोकशाहींमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वापरली जातात. इतर काही देश- बेल्जियम, एस्टोनिया, व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, मालदीव, नामीबिया, इजिप्त, भूतान, नेपाळ इत्यादी देश भारतीय निर्मित EVM वापरतात.

England, Italy, Germany Have Banned EVMs
Different sections of EVM

अमेरिका, ब्रिटन, रशिया भारतीय EVM का नाही वापरत?

ह्याचं कारण त्या-त्या देशांनी काहीही दिलं तरी मुख्य कारण एकच आहे ते म्हणजे त्यांचा EGO , अहंकार.
हे सर्व देश स्वतःला विकसित समजतात, तसे ते आहे सुद्धा. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत अमेरिका आणि इतर विकसित देश भारताच्या खूप पुढे आहेत. पण त्या विकसित राष्ट्रांना जे जमलं नाही ते आपल्या विकसनशील भारताने करून दाखवले. त्यांच्यापेक्षा अति सुरक्षित EVM भारताने बनवले. भारताने आपल्याकडील EVM मशीन त्यांना वापरण्यासाठी देऊ केल्या पण त्या विकसित राष्ट्रांचा अहंकार त्यांना ह्या भारतीय मशीन घेण्यापासून रोखत होते. कारण, भारत त्यांच्यापेक्षा लहान आणि विकसनशील देश आहे. म्हणून त्या देशांनी EVM असुरक्षित असल्याचा कांगावा करून भारतीय EVM घेण्यास नकार दिला आणि आजही मतपत्रिकेवर मतदान घेतात.  असे असले तरी, त्यांचा देशात ऑनलाईन मतदानाची तरतूद आहे, आणि आपणा सर्वांना माहीतच आहे की ऑनलाइन हॅकिंग सुद्धा होऊ शकते. या उलट भारतीय EVM पूर्णतः ऑफलाईन आहे, कुठलेही इंटरनेट जोडणी नाही किंवा कोणतीही मेमरी कार्ड/ पेन ड्राईव्ह लावण्याची सुविधा नाही. तर तुम्हाला कोणती मतदान प्रणाली अधिक विश्वासार्ह आहे असे वाटते? भारतीय EVM की इंग्रजांची ऑनलाइन/ ई-मेल मतप्रक्रिया.

EVM हॅक होऊ शकते हे बोलणारे सर्वजण हे पराभूत उमेदवार होते. जे जिंकले त्यांनी कोणतीही शंका उपस्थित केली नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असो. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत EVM हॅक झाल्याच्या खूप अफवा पसरल्या होत्या. EVM वर सर्वच राजकीय पक्षांनी टीका केल्या प्रामुख्याने काँग्रेस आणि आम आदमी पार्टी. पण 2017 च्या निवडणुकांमध्ये दिल्लीत 70 पैकी 67 जागा आम आदमी पार्टीला मिळाल्या आणि निवडणूक प्रक्रिया पण EVM वर पार पडली होती. त्यावेळेस आम आदमी पक्षाने EVM बद्दल एक शब्दही काढला नाही. का?

सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2004 ते 2014 या काळात कॉंग्रेसचे सरकार होते, त्यांनी EVM वर बंदी का घातली नाही?

कारण घोळ EVM मध्ये नाही तर राजकारण्यांच्या मनात आहे आणि वेळोवेळी ते जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्नात असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)
To Top