कमरेला कडदोरा बांधण्याचे शास्त्रीय कारणे | Tying thread around waist in Hinduism

0
आपणा सर्वांना माहीतच आहे की “करदोडा” किंवा “कडदोरा” काय आहे. कडदोरा हा शब्द “कटी” / “कड” आणि “दोरा” या शब्दांपासून बनलेला आहे, ज्यात “कटी” चा अर्थ संस्कृत भाषेमध्ये “कंबर” असा होतो. म्हणून कमरेला बांधल्या जाणाऱ्या दोऱ्याला कडदोरा म्हणतात. आणि कडदोरा हा नेहमी रेशमी धाग्याचाच असायला हवा. ‘करदोडा’ म्हणजे कमरेभोवती बांधावयाचा दोरा किंवा गोफ. हा गोफ आर्थिक परिस्थितीनुसार चांदीचा, रेशमाचा किंवा साधा दोरा असे.
kardoda
चित्र : कडदोरा

कडदोरा बांधणे हा कोणत्याही अंधश्रद्धेचा भाग नाही, ना कोणत्या धर्मापुरता मर्यादित आहे हे आपल्याला ह्या लेखामध्ये पुढे कळूनच येईल.

तर वळूया मुख्य मुद्द्याकडे.

आपल्याला महितच आहे की कंबर हा शरीराचा सर्वात रुंद भाग आहे. कमरेला बांधलेला कडदोरा एकेरी किंवा दुहेरी असला तरी तो शरीराच्या इतर कोणत्याही अवयवाला बांधायला पुरेसा आहे. पूर्वी ज्यावेळेस दवाखाने नव्हते, वैद्य आणि तांत्रिक-मांत्रिक उपचार चालायचे त्या काळात हे कडदोरे अतिशय उपयोगी होते आणि आजही तेवढेच उपयोगी आहे, त्याचा योग्य वापर करता आला तर.

  • तर, ज्यावेळेला सर्पदंश किंवा तत्सम प्राण्याचा दंश होतो त्यावेळेस त्यांचे विष शरीरात भिनले जाऊ नये म्हणून वैद्यकशास्त्र सांगते की दंशाच्या ठिकाणी 1 इंच वरच्या बाजूला धागा, दोरा किंवा पट्टा (बेल्ट) बांधा, जेणेकरून विष रक्तासोबत शरीरात जास्त प्रमाणात भिनणार नाही.
  • पूर्वीच्या काळी सर्वत्र जंगल आणि शेतकरी जास्त असल्यामुळे विषारी प्राण्यांपासून जसे की साप, विंचू, इंगळी ई. पासून जास्त धोका होता. अशावेळेस दंश झाल्यास प्रथमोपचार म्हणून तात्काळ उपलब्ध असलेली दोरी, धागा किंवा पट्टा बांधल्यास बाधित व्यक्तीच्या जीवाचा धोका कमी होऊ शकतो किंवा पूर्णपणे टळू शकतो. कडदोरा कमरेला बांधलेला असल्यास तो रेशमी असल्याने लवकरात लवकर कमरेचा सोडून बाधित व्यक्तीला दंशाच्या जागेवर बांधायला वापरला जायचा, मुळात याच कारणासाठी कडदोरा बांधण्याची प्रथा सुरु झाली असावी.
  • या कडदोऱ्याचा दुसरा फायदा असा की त्याचे कमरेसोबत होणारे घर्षण. हे घर्षण ऍक्युप्रेशर (Accupressure) प्रमाणे काम करते जे कंबर व त्या खालील इंद्रियांमध्ये होणारा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे लैंगिक इंद्रियांसंबंधी आजार होण्याची शक्यता खूप कमी होते.
हे एवढेच फायदे बघून तरी आपण हे मान्य करू शकतो की कडदोरा हा कोणताही अंधश्रद्धेचा भाग नसून आपल्या पूर्वजांनी आरोग्याच्या दृष्टीने घालून दिलेला चांगला पायंडा किंवा संस्कारच आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)
To Top